श्री रजनि महात्म्य

8 प्रतिक्रिया
|| ॐ नमो रजनिदेवोः नमः ||
|| श्री आळसोबा प्रसन्न ||

(सौऱ्याभौऱ्या... अरे सगळीकडे रजनि बसतायत आणि तुझ्या ब्लॉगवर त्याचा नामोल्लेखसुद्धा नाही...!!!??? पापम्... पापम्... त्या संकेतस्वामींनी रजनिदेवाच्या आरत्या रचल्या, आकाशने "संपुर्ण चातुर्मासा"प्रमाणे "संपुर्ण रजनिकांत" लिहायचा घाट घातलाय आणि तु... आँsssक थ्थूsss... अरे स्वतःला रजनिभक्त म्हणवून घेतो आणि ब्लॉगवर त्याबाबतित एवढी उदासिनता!!! परम् पापम्... परम् पापम्...)

खाड्ड्ड... (हा मुस्काट फोडल्याचा आवाज नव्हे)
खाड्ड्डदिशी डोळे उघडले...
देवा माफी माफी माफी...
हि घे कॉफी टॉफी... सॉरी सॉरी... हि घे चिंगम कॉफी...
(हुश्श्श... रजनिदेवाचा कोप टळला...)

मला अत्ता कळलं माझा ब्लॉग एवढा दुर्लक्षित का... असो... आता मी वेळ नं दवडता मला साक्षात्कार झालेली रजनिदेवासंबंधिची काही वैश्विक सत्ये इकडे मांडतो आहे. ह्याआधी फेसबुकवर ती झळकावली होतीच. पण आता ती ब्लॉगवर टाकून ब्लॉगची दृष्टच काढतो.

हि वैश्विक सत्य असल्याने वैश्विक (अर्थात इंग्रजी) भाषेत आहेत. रजनिदेवाचा महामंत्र "MIND ITT" वैश्विक असल्याने तोपण इंग्रजीतच आहे.

So what I say...
  • Hanumanji ripped his chest and showed Ram and Seeta, Rajani teared his chest and showed complete Ramayana (that too in HD).
  • Taj-Mahal is not white because it is made of marble. It was colourful but fainted when Rajini went to see it.
  • No one can write autobiography of Rajni, cause his Resume/CV only caused to be the world'd biggest book.
  • Rajni used insect killer while Programming, and so his programs are bug free.
  • Rajinikant can give pain to Painkillers and headache to Anacin.
  • Rajini can make cold to sweat and fire to freeze.
अत्तापर्यंतच्या समाधीसाधनेचे फळ म्हणुन हि सत्य पंचमहाभूतांकडुन आमच्या पंचेंद्रियास जाणवली. जसजशी हि तपश्चर्या अधिकाधिक तीव्र होईल तसतशी जास्त रजनिसत्य समोर येतिल आणि त्याचे खुले ज्ञान तुम्हालादेखिल करुन देण्यात येईल.
तोवर बोला "MIND ITT" अण्णा... रजनिच्या नावानं "MIND ITT" अण्णा...

आपला,
(रजनिभक्त) सौरभ

बाजी

12 प्रतिक्रिया
ब्बारं... आता तुम्हाला "बाजी मारणे" हा शब्दप्रयोग कसा रुढ झाला माहितीये का??? ह्यॅ ह्यॅ ह्यॅ... मी तुमची भाषापरीक्षा घेत नाहिये. पण "शल्य बोचणे" ह्या शब्दप्रयोगाची व्युत्पत्तीकथा ऐकून "बाजी मारणे" हा शब्दप्रयोग कसा जन्मला ते आठवलं आणि राहवलं गेलं नाही म्हणून सांगावसं वाटलं. बरय हे सांगण्यासाठी मी जास्त पकवत नाही. मी खाली जो दुवा देतो आहे त्यावरचा लेख आवर्जुन वाचा.

http://www.loksatta.com/lokprabha/20090515/cover.htm

ठळक नोंदी:
  • अपराजित कामगिरीने पराक्रम, विजय अश्या शब्दांना नविन ओळख देणारा - बाजी.
  • जगाच्या इतिहासातील एकमेव अजेय योद्धा - बाजी.
  • १७२८ मधील पालखेडची लढाई म्हणजे 'मास्टरपीस ऑफ स्ट्रॅटेजिक मोबिलिटी'. लष्करी डावपेच आणि रणनीतीच्या अभ्यसक्रमात हि लढाई आजही अमेरिकन सैनिकांना शिकवली जाते. असा चाणाक्ष युद्धनीतीज्ञ - बाजी.
  • सर्वात वेगवान घोडदळ असणारा योद्धा - बाजी.
  • पोख्त, प्रामाणिक, सत्यवचनी, द्रष्टा, मातब्बर, हळवा पण स्वतःबद्दलच्या चुकीच्या ओळखीच्या ग्रहणाने झाकोळलेला असा - बाजी.

आपला,
(बाजीस कुर्निसात) सौरभ

शल्य

21 प्रतिक्रिया
तुम्हाला कधी शल्य बोचणे/टोचणे, शल्य राहणे असला अनुभव आलाय का? मला सांगा शल्य बोचायला/टोचायला तो काटा आहे कि रहायला दुःखाला समानार्थी शब्द आहे? आयला मग हे शल्य म्हणजे मॅटर हाय काय? वेल, नसेल माहित तर मग तुम्हाला खालचा फाफटपसारा वाचावा लागेल....

डॉक्टरचा सहज फोन आला. २०-२५ मिनिटं शिस्तीनुसार आम्ही एकमेकांना पकवलं. मग फोन ठेवता-ठेवता...
डॉक: चल मग, ठेवतो. बोलू नंतर. जय श्रीराम.
मी: जय नकुल-सहदेव.
डॉक: हे काय??? नकुल-सहदेव का???
मी: आता तु जय श्रीराम बोल्लास, मी जय श्रीकृष्ण बोल्लो असतो. नेहमीची नावं झाली ती. म्हटल कोणा वेगळ्याचं नाव घेऊ. तसंपण नकुल-सहदेवांना कोणी विचारत नाही. ह्या नकुल-सहदेवांचा काही रोल होता का रे महाभारतात?
डॉक: हो, मग काय. कर्ण ह्यांच्यामुळे हरला.
मी: ऑ... काय सांगतोयस???
डॉक: हो. नकुल-सहदेव माद्रीची मुलं. शल्य माद्रीचा भाऊ, म्हणजे ह्यांचा मामा. महाभारताची लढाई झाली तेव्हा शल्य त्याचं सैन्य घेऊन पांडवांच्या मदतीला निघाला. पण तो वाटेत असताना शकुनीने डाव रचला. त्याने त्याच्यासाठी महाल बांधला. त्याची आणि त्याच्या सैन्याची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था केली. शल्याला माहित नव्हतं कि हे सगळं शकुनीने केलय. त्याला वाटलं कि युधिष्ठीराने हा सगळा पाहुणचार केला. युधिष्ठीराला तो थॅंक्यू म्हणायला गेला तेव्हा युधिष्ठीर बोल्ला की मी हे काही केलं नाही, मला काही माहित नाही. नंतर त्याला समजल की हे सगळं दुर्योधन आणि शकुनीने केलय. क्षात्रधर्मानुसार एखाद्याचं आदरातिथ्य घेतल्यावर तुम्ही त्याचं देणं लागता. शल्याने दुर्योधनाचं आदरातिथ्य घेतल्याने त्याने  दुर्योधनाला विचारलं की तुला ह्या बदल्यात काय पाहिजे? दुर्योधन शल्याला म्हणाला, तु तुझ्या सैन्यासह पांडवांविरुद्ध लढायला मला मदत कर. आता शल्य त्याच्या बहिणीच्याच मुलांविरुद्ध कसा लढेल? तेव्हा तो दुर्योधनाला म्हणाला, मी तुला माझं सैन्य देतो पण नकुल-सहदेव माझे भाचे आहेत. मी त्यांच्याविरुद्ध लढणार नाही. हवंतर मी तुझं सारथ्य करतो. श्रीकृष्णानंतर सारथ्य करण्यात जर कोणी पारंगत असेल तर तो शल्य होता. अर्जुनाला टक्कर देणारा धनुर्धारी कर्ण होता. अर्जुनाचा सारथी श्रीकृष्ण, म्हणुन कर्णालापण श्रीकृष्णाच्या तोडीचा सारथी मिळावा म्हणुन दुर्योधनाने शल्याला कर्णाचं सारथ्य करायला सांगितलं. शल्य तयार झाला. पण शल्याने कर्णाची वाट लावली. सारथ्याचं काम असत की तो ज्या योद्ध्याचं सारथ्य करतो त्याला प्रोत्साहित करायचं, जसा श्रीकृष्ण अर्जुनाला करायचा. पण शल्य कर्णाला घाबरवायला बघायचा. त्याला नेहमी टाकूनपाडुन बोलायचा. कर्णाला तसापण शाप होताच. जेव्हा त्याला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा त्याला त्याची विद्या वापरता येणार नाही. त्याला काही आठवणार नाही, त्याच्या मनात भिती असेल. कर्णाला डिमोरलाईझ करण्याचं सगळ्यात मोठ्ठ काम शल्याने केलं.
म्हणुनच मराठीत शल्य बोचणे/टोचणे/राहणे म्हणतात ते ह्यावरुनच.
मी: (फुलऑन आश्चर्यचकित!!! बोलेतो भौचक्का!!!) क्कॉय बोलतो...
डॉक: हो, कारण शल्याने मानसिक खच्चीकरण केलं.

तर आता तुम्हाला समजलं असेलच शल्य बोचणे/टोचणे/राहणे हा शब्दप्रयोग बोलीभाषेत कसा आला. त्यामागे एवढं मोठ्ठं रामायण... सॉरी महाभारत घडलं.

अवांतर:
मी: ते ठिकाय. पण ह्यात नकुल-सहदेवांचा काय संबंध???
डॉक: अरे, आता नकुल-सहदेव शल्याचे भाचे म्हणुन तो त्यांच्याविरुद्ध लढला नाही. आणि त्यांच्यामुळेच कौरवांच्या साईडने असुनपण पांडवांच्या फायद्याचं केलं.
मी: हम्म्म्म्म... इनडायरेक्ट रिलेशन. कॉम्प्लीकेटेड आहे.
पुढे आमच्या महाभारत ह्या टॉपिकवर बराचवेळ गप्पा झाल्या. डॉक्टरला महाभारत हा इतिहास असल्याचा पुर्ण विश्वास आहे. मला ते खरंखोटं ठरवण्याचा विवाद करण्यात रस नाही. महाभारत हे एका ऋषिने कोणा राजाला ऐकवलं होतं. राजाचं नाव आठवत नाही, पण डॉकने त्या ऋषिचं नाव सौती असल्याचं सांगितलं आणि सौतीने जे सांगितलं ते म्हणजे 'महाभारत'. व्यासांनी जे लिहलं ते 'जय' म्हणुन, ज्यात ३२,००० ओव्या आहेत/होत्या. पुढे त्यात अनेक ऋषिमुनींनी त्यांच्यात्यांच्या ओव्यांची भर टाकली, ज्यामुळे त्या ओव्यांची संख्या १ लाखाच्या आसपास गेली. ह्यामुळेच आणि भाषांतर करताना भावार्थ समजुन नं घेता शब्दार्थ समजुन घेतल्याने महाभारतातल्या (रामायणातल्यासुद्धा) अनेक घटनांची तर्कसंगती लावणं निव्वळ अशक्य आहे.

आपला,
(शल्यविशारद) सौरभ

बॉडी लॅंग्वेज to मिडिया लॅंग्वेज

9 प्रतिक्रिया
आनंदने माझा पोस्ट गुगल बझ्झवर टाकल्यापासून माझ्या ब्लॉगवर एकच धमाल उडालीये. जास्तीत जास्त आठवड्याभरात ६-८ पेजव्ह्यू असलेल्या ह्या ब्लॉगला एकाच दिवसात २००चा आकडा पार होण्याइतपत पेजव्ह्यू मिळाले. आकाशच्या भाषेत सांगायच झालं तर 'आ.प.'ने बझ्झवर एक लिंक पोस्ट काय केली आणि ब्लॉगवर व्हिजिटर्सचा एक ढग बरसून गेला. माझ्यासाठी वाळवंटात पूर येण्यासारखी हि गोष्ट. असो. मला लय भारी वाटलं. एवरेस्ट कुल्याखाली आल्यासारखं. मनाला अनेक लाडू फुटून त्याच्या चुर्णाने सारावल्यासारख्या गुदगुल्या झाल्या. दिलात अनेक चॉकलेट आईसक्रिमचे ज्वालामुखी फुटले. Thank you आनंद. (गळाभेट)
आकाशने आधीच्या पोस्टला एक जालिम हजरजबाबी पोस्ट लिहला. तो मी इकडे जस्साच्या तस्सा टाकतोय.

---------------------------------------------------

आता हे लिहलं तर खरं, पण जर हा पोस्ट सुपर हिट झाला, तर काय रे? > तू NEWS मध्ये झळकशील लेको!!
अश्या अमुक अमुक ब्लॉग मध्ये एक ब्लॉगर आपल्या उपासमारीचे हे वर्णन करतोये बघा!

मग एक डॉक्टर बोलेल > "मला वाटतं ह्याला जर रोज पुरे पूर आहार दिला तर हा पुन्हा एकदा ठणठणीत होऊ शकतो."

मग कॅमेरा इंडियन ऍम्बॅसीच्या ऑफिसवर
"हम पुरी कोशिश कर रहे हैं, की इस संगणकीय अभियंता को हम अपने देश में लाया जाये, और उसका पुनर्वसन करे."

राजसाहेब ठाकरे: "बघा सांगत होतो, त्या अमेरिकेतल्या गोऱ्यांची चमचागिरी करू नका, बघा आज माझा हा बंधू काय उपभोगतोय."

मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण : " हि खूपच गंभीर बाब आहे."

ठाणे रेल्वे स्थानकावरील एक प्रवाशी: "हे भारतीय नौकर वर्गाचा शोषण आहे, त्यांच्या ह्या हावरट वागणुकीचा जवाब त्यांना द्यावाच लागेल."

एक काळा कोट घातलेला म्हातारा वकील: "बघा आम्ही त्या कंपनीला आमच्या तर्फे एक leagal notice पाठवली आहे. जशी पुढे कारवाई होईल तुम्हाला कळवण्यात येईल."

बंड्याचा वर्गमित्र: "नाही, आधी तो चांगला तंदुरुस्त होता. त्याला डबा खायची वेळ इतकी प्रिय होती, की तो शाळेला मधल्या सुट्टीच्या १० मिनिट आधी यायचा."

बंड्याचे शेजारी: "आधी कसा तब्येतीत होता. आमच्या वडलांना एकदा पाय अडकवून पाडून कसा पसार झाला होता! नाही, त्याच्या वडलांनी पैसे दिले आम्हाला. तसं मामुली fracture झालं होतं. हिवाळ्यात दुखत अधून मधून. आमची धाकटी मग बाम लाऊन देते."

तुम्ही पाहत होता हा exclusive report फक्त "बोगस न्यूज" वर!
cameraman गुंड्या बरोबर मी "आचरट"

- आकाश

---------------------------------------------------

आता हा आकाश कोण? आकाश गुप्ते. माझ्या पहिल्या वर्तुळात येणारा मित्र. कलंदर हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणा किंवा बिलंदर कार्ट, both things define him. त्याच्या http://amritasyaputra.blogspot.com/ ह्या ब्लॉगला भेट देऊन बघा. तुम्हाला त्याच्याबद्दल थोडी कल्पना नक्किच येईल. ;) :)

आपला,
(आकाशमित्र) सौरभ

बॉडी लॅंग्वेज

20 प्रतिक्रिया
"काय रे ढेऱ्या... काही अक्कल आहे कि नाही तुला?" बंड्याच्या डोस्क्याने विचारचक्राला थोडा ब्रेक मारुन थांबवून बंड्याच्या पोटाला विचारलं.
"का... काय झालं?" बंड्याचं पोट AKA ढेऱ्या.
"अरे काय बघावं तेव्हा डुरडुर डरकाळ्या मारतोस. ऑ?"
"मग काय. च्यायला एक तर दिवसभर रिकामं ठेवायचं. काही खायला नाही. मग काय करणार?"
"अरे पण काय साला कधीही चालू व्हायचं? कधी कुठे केव्हा गुडगुडावं काही काळवेळ आहे कि नाही?"
"ते मला काही माहित नाही. टायमावर मला कायतरी पचवायला मिळालं तर मी अशी गुडगुड करणार नाही. साला काय अवस्था झालीये. ते हात आणि पाय बघ. हात अगरबत्ती और पाव मोमबत्ती. त्या पायांना ५ मिनिटं धावता येत नाही आणि हातांना जरा वजन पेलवत नाही."
"अय... आम्हाला काय बोलायच नाय काय.." बंडूचे हातापाय स्वतःला झटकून संभाषणात उतरले.
"मी धावेन मैलभर. पण तो छाताडातला पंप जास्त धडधडायला लागतो. त्याची चोंदलेली पाईपलाईन दुरुस्त करा." - बंडूच्या तंगड्या
"हो. आणि मी उचलेन मणभर वजन. पण त्या कंबरेने आणि पाठीने कच खाल्ली. जरा आपलं वजन उचलून २ इंच वर काय गेलो तर त्या मणक्यांची माळ सैलावली. द्याव लागलं मग सोडून." बंड्याच्या हातांनी त्यांच्या रत्ताळ्यासारख्या स्नायूंचा उगीच फुगा फुगवला.
"ओ दंडाधिकारी, पंक्चर झालेल्या टायरमधे उगीच हवा भरायचा प्रयत्न नका करु." वासाड चाळीतले ३२ चाळकरी दात फिदफिदले.
"गपता का आता. का हाणू दोन आणि काढू सगळ्यांना बाहेर." हाताची बोटं मोडता मोडता कडाडली.
"हाय का हिंमत तेवढी?" दातांनीपण ओठ खाल्ले.
"च्यायला, परवाच तोंडावर उताणा झालेला तेव्हाच ढेपाळणार होता."
"पण ढेपाळलो का? साला ह्या डोळ्यांचा फोकस बिघडला म्हणून आपटलो. ढापण लावूनपण धड बघता येत नाही."
हे ऐकून डोळे वाटारले. "ये बत्ताश्या. जास्त बोल्लास. माझा फोकस नीटच होता. त्या कानांचे फाटलेले पडदे बदला. मागून जोरजोरात मारलेला हॉर्न आणि बोंबा ऐकू आल्या नाहीत त्यांना. आणि दिली गाडीने धडक तिच्याआयला."
"ए वाट्टाण्या, ऐकून घेतो म्हणून काय वाट्टेल ते ऐकवशील काय?" कानाच्या पाळ्या लालगरम झाल्या. "तो हेडफोन घालून फुल्ल व्हॉल्यूममधे हार्डरॉक लावून एकतर ते माझे पडदे बधिर केलेले. अश्यावेळी ढुंगणाखाली बॉम्ब फोडला असता तरी मला समजणं शक्य होतं का रे?"
"अरे काय चाल्लय काय? आपण सगळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतोय. अरे एकाच शरीराचे अवयव आपण. असं आपापसात भांडून कसं चालेल?" डोस्क्याने एक समजूतदार विचार मांडला.
"बरोबर आहे तुझं डोस्क्या. पण ह्या बंड्याने आपली काही काळजी घेतली पाहिजे की नाही? आता तु एवढा विचारवंत. नेहमी कामात असलेला. तुझीपण फिकर नाही त्याला. साला पुर्वी कसा काळ्याकुळकुळीत घनदाट केसांनी अच्छादलेला होतास तु. आता तेपण पांढरे पडायला लागलेत. विदर्भाच्या भेगाळलेल्या जमिनीसारखी त्वचा कोरडी होऊन कोंडा झालाय. अरे किती प्रॉब्लेम्स, कधी सुटणार हे प्रॉब्लेम्स???" सारं शरीर गलबललं.
"सुटतील... सुटतील..." डोस्क्याने स्वतःला शक्य तितकं शांत ठेवत म्हटल. "ह्या बंड्याच्या मनानं एकदा उचल खाल्ली पाहिजे. आपण त्यालाच विचारुया."
"बोल मना.. बोल... आमची हि अशी दुरावस्था कधी दूर होणार? सांग..."
इतका वेळ शांत असलेल्या बंड्याच्या मनाची थोडीशी चलबिचल झाली. "हम्म्म्म... मला समजतय. सगळं जाणून आहे मी. ह्यासाठी सगळा आळस झटकून आपण सर्वजण सक्रिय होणं गरजेचं आहे. हि बाब गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. मी काय म्हणतो. आता ज्याम झोप आल्यासारखी वाटत्ये. उद्या उठल्यावर ताजातवाना होऊन मगच काय ते तुम्हाला सांगतो. चला मग... तोवर एक मस्तपैकी झोप काढुयात का?"
झोपेचं नाव काढताच हो हो म्हणत सगळेच अवयव गळून पडले. हातांनी थोडं लांब होत लाईट बंद केले आणि चादर ओढून घेतली. तंगड्यांनीपण पटकन स्वतःला चादरीत दुमडून घेतलं. डोळ्यांनी ताबडतोप शटर ओढून घेतले. कानांनी पडदे झटकून घडी घालून ठेवले. डोस्क्याने त्याचा कंप्यूटर स्लिपमोडमधे टाकला.

शरीरसंपदा आणि आरोग्यविकासाचा ऐरणीवरचा प्रश्न नेहमीसारखाच उद्यावर टाकून बंड्याचं धूड झटक्यात निद्राधिन झालं.

आपला,
(Fit & Fine) सौरभ

पावभाजी

10 प्रतिक्रिया


हि पावभाजी चाखल्यावर मी मोठ्या गर्वाने स्वतःबद्दल शेखी मिरवू शकतो की पावभाजी बनवण्यात मी कोणालाही मागे टाकू शकतो.

आपला,
(बल्लव) सौरभ


संत्रवाणी - म्हणी

3 प्रतिक्रिया
|| श्री आळसोबा प्रसन्न ||

"To err is a Human" - by some Erroneous person


"To debug/fix is an Engineer" - Baba Bongs

आपला,
(ज्ञानीबाबा) सौरभ