ब्बारं... आता तुम्हाला "बाजी मारणे" हा शब्दप्रयोग कसा रुढ झाला माहितीये का??? ह्यॅ ह्यॅ ह्यॅ... मी तुमची भाषापरीक्षा घेत नाहिये. पण "शल्य बोचणे" ह्या शब्दप्रयोगाची व्युत्पत्तीकथा ऐकून "बाजी मारणे" हा शब्दप्रयोग कसा जन्मला ते आठवलं आणि राहवलं गेलं नाही म्हणून सांगावसं वाटलं. बरय हे सांगण्यासाठी मी जास्त पकवत नाही. मी खाली जो दुवा देतो आहे त्यावरचा लेख आवर्जुन वाचा.
http://www.loksatta.com/lokprabha/20090515/cover.htm
ठळक नोंदी:
- अपराजित कामगिरीने पराक्रम, विजय अश्या शब्दांना नविन ओळख देणारा - बाजी.
- जगाच्या इतिहासातील एकमेव अजेय योद्धा - बाजी.
- १७२८ मधील पालखेडची लढाई म्हणजे 'मास्टरपीस ऑफ स्ट्रॅटेजिक मोबिलिटी'. लष्करी डावपेच आणि रणनीतीच्या अभ्यसक्रमात हि लढाई आजही अमेरिकन सैनिकांना शिकवली जाते. असा चाणाक्ष युद्धनीतीज्ञ - बाजी.
- सर्वात वेगवान घोडदळ असणारा योद्धा - बाजी.
- पोख्त, प्रामाणिक, सत्यवचनी, द्रष्टा, मातब्बर, हळवा पण स्वतःबद्दलच्या चुकीच्या ओळखीच्या ग्रहणाने झाकोळलेला असा - बाजी.
आपला,
(बाजीस कुर्निसात) सौरभ
12 प्रतिक्रिया:
सौरभ...दुव्याबद्दल धन्यवाद.
@मनमौजी: :) बऱ्याच महिन्यांपुर्वी हा लेख वाचनात आलेला. सुदैवाने अजुनही दुवा उपलब्ध आहे.
बाजीस कुर्निसात
-yog
thnx for link
@Yog/विक्रम: :)
ह्या वाक्प्रचाराच्या पाठी हा असा इतिहास असेल...मला कल्पना देखील नव्हती...
श्रीराज: interesting, isn't it? :D
Yes indeed!
मला खूप आधीपासून हा प्रश्न होता आणि ह्याचे उत्तर 'पेशवा बाजीराव' किंवा 'बाजीप्रभू देशपांडे' किंवा 'मुरारबाजी' किंवा 'बाजी पासलकर' देखील असू शकतात.
अजून एक प्रश्न आहे मला...
अनेकदा आपण '१७६० चुका करू नकोस' हा वाक्प्रचार ऐकतो ह्यचा संबंध पानिपाताशी आहे का?
१७६० मध्ये केलेल्या चुकांमुळेच आपण जानेवारी १५, १७६१ रोजी पानिपत जिंकू शकलो नाही.
@रोहन: शक्यता असू शकतात, पण ईतिहासातली कामगिरी लक्षात घेता, तो बाजीराव पेशवाच असावा. आणि '१७६०' ह्याबद्दल मी एके ठिकाणी वाचलेलं, तो लेख मिळत नाहिये. ह्याचा संबंध फक्त पानिपतशी असेल असं वाटत नाही. कारण हि संख्या आपण निव्वळ 'चुक' ह्या शब्दाशी नाही तर बाकी अनेक शब्दांबरोबर जोडतो. जसे, '१७६० उपदेश/सुचना/गोष्टी/भानगडी/पद्धति' इत्यादी. ह्याबद्दल माहिती मिळाली तर सुचित करेनच; जर तुला काही मिळाली तर कळव.
मी तेच म्हणतोय... १७६० उपदेश/सुचना/गोष्टी/भानगडी/पद्धति ह्या सर्व गोष्टींचा संदर्भ १७६० बरोबर जोडला जातोय तो पानिपत असावा अशी मला खात्री आहे...
रोहन, तु म्हणतो आहेस तर तसंच असेल. मी पुन्हा बरीच शोधाशोध केली पण काही संदर्भ मिळाले नाहित.
Post a Comment