श्री रजनि महात्म्य

|| ॐ नमो रजनिदेवोः नमः ||
|| श्री आळसोबा प्रसन्न ||

(सौऱ्याभौऱ्या... अरे सगळीकडे रजनि बसतायत आणि तुझ्या ब्लॉगवर त्याचा नामोल्लेखसुद्धा नाही...!!!??? पापम्... पापम्... त्या संकेतस्वामींनी रजनिदेवाच्या आरत्या रचल्या, आकाशने "संपुर्ण चातुर्मासा"प्रमाणे "संपुर्ण रजनिकांत" लिहायचा घाट घातलाय आणि तु... आँsssक थ्थूsss... अरे स्वतःला रजनिभक्त म्हणवून घेतो आणि ब्लॉगवर त्याबाबतित एवढी उदासिनता!!! परम् पापम्... परम् पापम्...)

खाड्ड्ड... (हा मुस्काट फोडल्याचा आवाज नव्हे)
खाड्ड्डदिशी डोळे उघडले...
देवा माफी माफी माफी...
हि घे कॉफी टॉफी... सॉरी सॉरी... हि घे चिंगम कॉफी...
(हुश्श्श... रजनिदेवाचा कोप टळला...)

मला अत्ता कळलं माझा ब्लॉग एवढा दुर्लक्षित का... असो... आता मी वेळ नं दवडता मला साक्षात्कार झालेली रजनिदेवासंबंधिची काही वैश्विक सत्ये इकडे मांडतो आहे. ह्याआधी फेसबुकवर ती झळकावली होतीच. पण आता ती ब्लॉगवर टाकून ब्लॉगची दृष्टच काढतो.

हि वैश्विक सत्य असल्याने वैश्विक (अर्थात इंग्रजी) भाषेत आहेत. रजनिदेवाचा महामंत्र "MIND ITT" वैश्विक असल्याने तोपण इंग्रजीतच आहे.

So what I say...
  • Hanumanji ripped his chest and showed Ram and Seeta, Rajani teared his chest and showed complete Ramayana (that too in HD).
  • Taj-Mahal is not white because it is made of marble. It was colourful but fainted when Rajini went to see it.
  • No one can write autobiography of Rajni, cause his Resume/CV only caused to be the world'd biggest book.
  • Rajni used insect killer while Programming, and so his programs are bug free.
  • Rajinikant can give pain to Painkillers and headache to Anacin.
  • Rajini can make cold to sweat and fire to freeze.
अत्तापर्यंतच्या समाधीसाधनेचे फळ म्हणुन हि सत्य पंचमहाभूतांकडुन आमच्या पंचेंद्रियास जाणवली. जसजशी हि तपश्चर्या अधिकाधिक तीव्र होईल तसतशी जास्त रजनिसत्य समोर येतिल आणि त्याचे खुले ज्ञान तुम्हालादेखिल करुन देण्यात येईल.
तोवर बोला "MIND ITT" अण्णा... रजनिच्या नावानं "MIND ITT" अण्णा...

आपला,
(रजनिभक्त) सौरभ

8 प्रतिक्रिया:

आनंद पत्रे said...

हाहाहाहा .. लोळालोळी... कैच्याकै भारी

सौरभ said...

आनंद, अरे हसतोस काय!!! कवळी लागेल... चेष्टा नव्हे ही... रजनिदेवा त्याला माफ कर... अजाण बालक आहे तो.

rajiv said...

तुझ्यावर रजनिदेवाचा हाथ पडलेला दिसतोय....... !!
अचाट , अद्भूत ,.....इ. इ .


महात्म्य सांगितलेस. ... आता व्रत सांगून टाक म्हणजे पामारांवर पण प्रसन्न होतील

sanket said...

excellent... गेले काही दिवस नव्हता वाचला तुझा ब्लॉग.. reading it now.. सही लिहीलंय. आकाशने सांगितलं होतं हे g-talk वर.. वाचतांना मजा आली.
रजनीदेवाच्या नावानं.. MIND IT अण्णा....

सौरभ said...

@संकेतस्वामी: रजनिदेवांचे परमभक्त... आपण इकडे हजेरी लावलीत अहोभाग्य...

रजनिदेवाजींचा गजर, करुया जगभर,
दाही दिशांत ललकार, दुमदुमे आकाश पाताल |
जनी निंदे मला, रजनिने तुला यडा केला,
मी म्हणे तुम्ही, देव नाही वळखिला ||

रजनीदेवाच्या नावानं... MINDD ITT अण्णाsss...

sanket said...

वाहवा स्वामी...
रजनीस्तुतीच्या ओव्या वाचून, बघून कर्ण-चक्षू धन्य जाहले..
रजनीभक्तीसागरात आपण गटांगळ्या खात असल्याचे अस्मादिकांच्या दिव्यदृष्टीस दिसले. पण रजनीकृपेने आपण बुडणार नाहीत..

जब उपाय कोई काम न आये।
रजनी नाम संकट हर जाये॥
--- स्वामी संकेतानंद

रजनीदेवाच्या नावानं... MINDD ITT अण्णा...

sanket said...

अस्मादिक फक्त कर्ण-चक्षू म्हणाले काय?? अहो सर्व पंचेद्रिये आणिक M. नाईट शामलन वर्णित षष्ठम इंद्रिय पण धन्य झालेत...

सौरभ said...

धन्यवाद धन्यवाद धन्यवाद (सद्गदित गळाभेट)... संकेतानंदजी आता आपण येथे रजनिदेवांच्या ओव्या, भजनं, किर्तनं ह्यांची रास लावणार आहोत. लोभ असावा.

भजा रजनि... गर्जा रजनि... MINDD ITT अण्णाsss...

Post a Comment