१३ ऑक्टोबर:
काल झालेल्या तोंड ओळखी, आज जरा वाढवून केरळ माहिती मिळवण्यात घालवला. बरेच दोस्त झाले (टी.सी. मोजून). रंजीत कडून मल्याळमचे धडे घेतले, अगदी शिव्यांपासून ते ख्यालीखुशाली विचारणे, एवढे मल्याळममध्ये शिकून घेतले. एका कागदाच्या चिट्ठीवर ते सगळे लिहून घेतले. पुढे काय काय बघायचं आणि कसा रूट घ्यायचा हे हि ठरवलं. २ सपाटेबाज केळ्यांनी दुपारची भूक पळवली होती. संध्याकाळी मग दहीबुत्ती खाऊन पोट शांत केलं. बरेच सल्ले मिळत होते, ते सगळे फिल्टर करून मी माझ्यापाशी ठेवत होतो. रंजीतने मी तिकडे एकटाच आणि नवीन असल्याने रात्री १० ते पहाटे ५ भटकणे टाळायला सांगितला. मी हा सल्ला काटेकोरपणे पाळायचा ठरवला.
आयुष्यात कोणी मला वेळ "pause " करायची जादू शिकवा रे........
*****
मल्याळम शब्दांची यादीतले काही शब्द (ह्यातले काही तमिळ शब्द पण आहेत):
Yendha Sugama - How are you?
Sugam - Fine
Yavailav - How much?
Chetta - Elder brother
Annian - Younger brother
Chechi - Elder sister
Aniyati - Younger sister
Nanni - Thank you
Mannika - Sorry
Malayalam ariyele - I cant speak malayalam
Para - Tell me
Yevada - Where is
Varu - Come
ह्या काही निवडक शब्दांच्या जोडीला काही इंग्लिश शब्द जोडून मला त्यातल्या त्यात माझं काम चालवून घेता आलं.
(संध्याकाळी सगळ्यांचे फोन नंबर आणि मेल आयडी घेऊन घेतले.....)
आपला,
(सुगम) माचाफुको
6 प्रतिक्रिया:
:) छान. आज मल्याळी भाषेचा वर्ग झाला! त्याबद्दल धन्यवाद! :)
चला आमची पण शिकवणी सुरु झाली म्हणायची ....
`IDEA'वाल्यांनी तुला भेटूनच तर जाहीरात सुरु केलीय
>> ते सगळे फिल्टर करून मी माझ्यापाशी ठेवत होतो.
हे हे.. चालू द्या.. पण माचाफुको एवढे छोटे छोटे भाग नको रे टाकूस.. :) वाट बघतोय..
>> Malayalam ariyele - I cant speak malayalam
सुरेख.....म्हणजे "मला मल्याळी बोलता येत नाही" हे देखील मल्याळी भाषेतूनच सांगायचे.....कल्पना आवडली...
माझी थोडक्यात ओळख...मी तुझा blog बऱ्यापैकी follow करतो....फक्त कधी प्रतिक्रिया लिहिण्याचा योग आला नाही....चूकभूल माफी असावी
माचाफुकोचे कारनामे!!! "Nanni" for sharing :P
Post a Comment