तशी मला माचाफुकोने द्रविडी प्राणायामसाठी प्रस्तावना लिहायला सांगितली होती. ते काही आपल्याला झेपलं नाही. पण हो, ह्या प्रावासाची सांगता मात्र करतोय. कराविच लागणार. कारणच तसं आहे. द्रविडी प्राणायामच्या आठही भागांवर तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया मनाला खुप उभारी देणाऱ्या आहेत. पण तुमच्या प्रतिक्रियांना परत प्रतिक्रिया दिली नाही. कारण, सांगण्यासारखं बरंच आहे.
तुम्हा सर्वांना एवढं नक्की समजलं असेल की द्रविडी प्राणायामातील पुर्ण प्रवास खरा घडलेला प्रसंग आहे. पण तरी मी काही गोष्टी औपचारीक रित्या इकडे जाहिर करु ईच्छितो -
१) हो, द्रविडी प्राणायाम, हा एक घडलेला १००% अस्सल, खर्राखुर्रा आणि कोणतीही अतिशयोक्ती नसलेला प्रवास आहे. उगीच मेंदूचे तंतू ताणून, शब्दांचे बुडबुडे सोडुन, विचारांचे पंख, कल्पनेतले रंग.... ब्ला ब्ला ब्ला... (विसरलो, काय म्हणायच होतं ते...) तर असलं काही केलं नाहीये.
२) हा प्रवास मी केलेला नाही.
३) "हे आठही भाग मी लिहले नाहित."
बरं, मग तरी हे सर्व प्रवास वर्णन माझ्या ब्लॉगवर का? ब्लॉगवरच ट्रॅफिक वाढवायला तर नक्किच नाही. (मोठ्ठा नाही. नाहीतला "ना" आणि "ही" जितके जास्त खेचता येतिल तितके खेचा.) खेचलं??? बास आता.
पण प्रतिक्रियांमधे तुम्ही माझं/माझ्या लिखाणाचं जे कौतुक केलं ते वाचुन ज्याम मजा आली. मलापण आणि माचाफुकोलापण. तुमच्या ह्या सर्व कौतुकांचा माचाफुको एक(लो)टा हकदार आहे. आणि त्याच्यापर्यंत तुमच्या सर्व भावना पोचल्या आहेत. मधे मी होतो, पण हरकत नाही. तेवढंच माझं वजन वाढलं. (गणित सोप्पय - कौतुक केलं -> मुठभर मांस वाढलं -> वजन वाढलं, पुढल्यावेळी एवढं स्पष्टीकरण देणार नाही, टायपायला बोर होतं.)
तर.... (विषय भरकटलाय!!!)
अच्छा... तर मग हे सगळं प्रवास वर्णन माझ्या ब्लॉगवर का?? आणि तेपण "माचाफुको" अश्या सतरंगी नावाने का??? ह्याचं कारण असं आहे की, माचाफुको जरा लहरी आहे. कधी काय हुक्की येईल भरोसा नाय. चॅटींग करताना एकदा सहज म्हणाला, एक फ्रिक ट्रिप मारायचीये. मीपण, करतोय्स, कर; म्हणुन नमो नमो केलं. आता शक्यतो (इतर)कोणी असा आगाऊपणा करतं तेव्हा आम्ही आगीत तेल घालतो. उगीच मग समोरच्याला उपसवतो. पुढे त्याच्या होणाऱ्या फजितीचा फुकट तमाशा बघायला मिळतो. पण माचाफुकोची बात निराळी आहे. हा पठ्ठ्या असं बोल्ला म्हणजे आज ना उद्या हा ८-१० दिवसांसाठी गायब होणारच हे नक्की. त्याच्या हाव (कोकणी हो)ला हाव केलं खरं, पण साला काळजीभी वाटली. नंतर एकदा दुसऱ्या मित्राशी बोलताना तो सहज म्हणाला, "अरे, माचाफुको चाल्लाय बॅंगलोरला प्रोजेक्टसाठी." (मी - ह्यॅह्यॅह्यॅ) नंतर दोनतीन दिवसात अजुन एक मित्र बोल्ला, "माचाफुकोने फोन केलेला. प्रोजेक्टसाठी बॅंगलोरला पोचलाय म्हणुन निरोप द्यायला सांगितलय तुला." (मी भौचक्का!!! पोचलापण!!!! च्याsssमायला!!!)
त्यानंतर काही दिवसांनी माचाफुको ऑनलाईन भेटला. "नेटकॅफे (तेच नेटकॅफे जिकडे त्याने "तोलमोल" केलेली) मे है! फोटोका बॅकअप ले रा!! एक बॅच भेजता..." आणि मग त्याने एकदोन किस्से असे ऐकवले, १५०० वरुन एकदम १०० रुपयात कलामंडलममधे झालेली पुर्ण व्यवस्था, (कढईतुन काढलेल्या ताज्या गर्रम जिलेबीसारखे)कथकलीचे फोटो, राजर्षी, मल्लू फिल्म शुटिंग... बॉस्स... माझ्या डोक्यावरचे सगळे केस उद्गारवाचक चिन्हासारखे उभे!!! व्वेड व्वेड व्वेड!!! मी बसल्याबसल्या टुणटुणत होतो. म्हंटल, गड्या... तु हिट्ट हैस!!! हे नुसतं बघुन जर मीच एवढा excite झालोय तर मग बाकीच्यांनापण नक्कीच धमाल येईल. त्याच्याकडुन प्रत्येक दिवसाच्या नोंदी मागवल्या. सांगितलं टाक ब्लॉगवर. पण आता आली का पंचाईत. जर हे द्रविडी प्राणायाम नामक माचाफुको महात्म्य त्याच्या घरच्यांना कळालं, तर गेम ना भाय!!! लफडा फुल्टू!!! पण आपल्याला किस्सा तर ऐकवायचाय. तो फिर अपना ब्लॉग कायको है??? छापो इधरिच!!! तेबी "माचाफुको" टोपणनाव लगाके. छाप्या ना मग लगेच आपनने आक्खी सिरीज. डरता क्या?!
तो ये बात थी, ती सिरीज इकडे टाकायची "माचाफुको" म्हणुन. असो, अजुन एक. तुम्ही विचार करत असाल (नसाल तर करा, आणि नाही केलात तरी मी सांगणार) "माचाफुको" म्हणजे नक्की काय??? तर "माचाफुको" हा "स्वाहिली" भाषेतला एक शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो "CHAOS" (आमचे समानार्थी शब्द: कल्लोळ, त्राहीत्राही, आग आग आग, हैदोस). तर पठ्ठ्याच्या व्यक्तिमत्वाला हा शब्द अगदी चपखल बसतो. म्हणुन "माचाफुको" ह्या टोपणनावाने सदर लिखाण.
(कारणे, संदर्भासहित स्पष्टीकरणं देऊन झाली... च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव... हेपण करुन झालं!!! हम्म्म... तर आता तुमच्या प्रतिक्रियांना प्रतिक्रिया)
राजीव, अनघा, श्रीराज, अपर्णा, आनंद, विद्याधर, हेरंब, Panda, पंकज, रोहन, गौरव - खुप खुप खुप आभार. (खरं तर हे अश्या पद्धतिने आभार मानणं आम्हाला आवडत नाही आणि पटतही नाही. तुमच्या प्रतिक्रिया इतक्या दिल-से आहेत की वाचल्यावर तुम्हाला एक जादू की झप्पी, जोरदार HI5 किंवा कड्डक टाळी द्यावीशी वाटत्ये.)
तुम्ही "माझं" जे कौतुक केलं, ते पाहुन आम्हाला जाम हसू येत होतं. मला खरतर कसंबसं होत होतं. पण म्हटल ठिकाय चालू दे ना जे चाल्लय ते. मलापण वजन वाढवायचंच होतं. (वरचं समीकरण आठवा)
राजीवजी, द्रविडी प्राणायाम वाचुन तुम्ही माझ्या बुद्धीच्या, व्यक्तिमत्वाच्या, लिखाणाच्या प्रेमात पडलात. तुम्हाला "माझ्या"बाबत निराश केल्याबद्दल माफी. मी आधीच वॉर्न (शेन वॉर्न नव्हे) केलेलं. पण तुमचे प्रेम माचाफुकोपर्यंत पोचते झाले आहे. आणि ते द्वाड कार्ट हैच लई प्रेम करण्यासारखं.
अनघा मॅडम, हा हा हा!!! तुम्ही खुप guesses केलेत. पण ते चुकले. :P ;D कन्याकुमारीला नक्की जाऊन या. भारताच्या टोकाशी उभे राहुन तिन समुद्रांचा संगम आणि तिथल्या भिन्न रंगछटा पहाणे, "स्वामी विवेकानंद रॉक" हे दैवी अनुभव आहे.
आनंद, अरे है किधर??? खरंय, करायला आत्मविश्वास लागतो, पण त्याहुन जास्त एक वेड असावं लागतं. :D
अपर्णा, मला खात्री आहे हा (खयाली)पुलाव तुला नक्की आवडला असेल. ;)
हेरंब, दिवसभरात ज्या घटना घडल्या त्यांच्या नोंदी प्रामाणिकपणे मांडायचा प्रयत्न केला. म्हणुन काही लेख मोठे, काही छोटे झालेत. आणि रांचो आणि फुन्सुख वांगडूचं जसं होतं तसं माचाफुको आणि सौरभबद्दल नाहीये. :P (हेहेहे)
बाबा THE PROPHET, (ह्हिहॉहॉहॉ) खरी आयडेंटिटी नाही डिस्क्लोज करु शकत.
श्रीराज, (ख्यॅख्यॅख्यॅ) तुनेभी अंधेरेमें काफी तीर चलाये. पण एकसुद्धा निशाण्यावर नाही लागला.
Panda, तु माझा blog बऱ्यापैकी follow करतोस, आणि तु ह्यावर पहिल्यांदा खास प्रतिक्रिया दिलीस. छान वाटलं. :D
गौरव, हा धाडसी धुरंधर जो कोणी आहे तो "माचाफुको"च.
पंकज (पंकज म्हंटल की मला सिंपु सिंगचा
Ask the Pankazz आठवतो.) अरे, तु कॅमेरा फेकणार असशील तर हवं तर आमच्या तोंडावर फेकुन मार. सोबत त्याच्या लेन्सेस/किट तेपण फेकुन मार. आम्ही आनंदाने हा मार सोसुन त्याचा स्विकार करु.
रोहन, (पुन्हा हिहॉहॉहॉ) माझ्यामते आता बऱ्याच गोष्टींची उत्तरं मिळाली असतिल तुला. आणि हो, प्रवास १० तारखेच्या आधी संपवलाय रे. :D :D
आता जाता जाता (माहितीये बरंच लिहलय, पण हत्ती गेला नी शेपुट राहिलं असं व्हायला नको म्हणुन)... मला ह्या प्रवासाबद्दल काय वाटतं ते...
माचाफुकोशी बोलताबोलता तो एकदा सहज म्हणाला, (पाचव्या दिवसाची शेवटची ओळ >>) आयुष्यात काहीही घडू शकतं! आपलं नेहमीचं कवच सोडून थोडं बाहेर पडलो काय आणि काय काय भारी अनुभव आलेत!
ह्या वाक्याने एक जादूची कांडी फिरवल्यासारखी वाटत्ये मला. आपणच आपल्या भोवती जे कुंपण घालुन ठेवलय ते भेदण्याची ताकद आल्यासारखं वाटतय. हे कवच फोडुन, चौकट मोडुन, उंबरठा ओलांडुन, कोषातुन (काहीही असो) बाहेर येणं गरजेच आहे. काहीतरी भारी अनुभवण्यासाठी नसलं तरी खुप काही शिकण्यासाठी. आता हे भेदणं काही कठीण आहे का?? माचाफुकोने जे केलं ते काही विक्षिप्त आहे का?? नक्कीच नाही. पण नेहमीच्या साच्याबाहेरच आहे. ह्हा, प्रवासाची गोष्ट निघालेली तेव्हा तो मला म्हणालेला, मी जे करतोय त्याचं outcome काय असेल माहित नाही. कदाचित खुप रोमांचक अनुभव असेल किंवा खतरनाक. पण जे काही असेल ते अविस्मरणीय असेल. (महेश कोठारेसारखं उजवी मुठ डाव्या तळव्यावर मारत) Damn it!!! आपल्याला हा साचाच मोडता येत नाही राव. आणि आपली उगीचच लाईफच्या बाबतीत कोल्हेकुई चालु असते. मोडा तिच्यायला तो साचा. ओय ओय ओय... मोडण्यापुर्वी आवरा!!! साचा मोडा म्हणजे एकदम पिसाटलेल्या कुत्र्यासारखं काही सद्सद्सौरभबुद्धीला (नेहमी विवेकला कशाला भाव द्यायचा???) सोडुन अनैतिक/बेकायदेशिर करु नका रे!!! च्यायला पोलिस मला घेतिल रिमांडमधे.
असो, माचाफुकोचं आपल्याला भारी कौतुक आहे. त्याच्याबद्दल किती नी काय बोलावं. आपल्याकडुन एक प्रेमळ गळाभेट
आणि त्याच्या रुतब्याला सलाम
!!!
आपला,
(माचाफुकोलेला) सौरभ