अतिप्रसंग

5 प्रतिक्रिया
खाडखाड... खाडखाड... खाडखाड... खाडखाड... रात्री १:३० वाजताच्या काळोखात निव्वळ लॅपटॉप स्क्रिनच्या अंधुकश्या उजेडातसुद्धा बंड्याची बोटं किबोर्डवरुन सफाईने फिरत होती. किबोर्डकडे बघायची त्याला तशी गरजच नव्हती. बंड्या, बबडी, गुंड्या, गुड्डी, पप्या, पपली सगळे आज बऱ्याच दिवसांनी एकत्र ऑनलाईन येऊन कॉन्फरन्स करुन बोलत होते. बाहेर बर्फ पडायचा थांबलेला. पण थोडा पाऊस पडून गेल्याने हवेत ओलावा आलेला आणि त्यामुळे नेहमीपेक्षा जास्तच थंडी वाटत होती. रजई घेऊन अघळपघळ अंथरुणावर पसरलेल्या बंड्याला उठून हिटर चालू करुन येणं जिवावर येत होतं. थोडं इकडे तिकडे होउन बाजुलाच बिछान्यावर पडलेलं जॅकेट चढवुन बंड्याने पुन्हा अंगाभोवती रजईचा कोष केला. आजचं जेवण नेहमीप्रमाणेच उशिरा झालेलं. सगळ्या मित्रमंडळींशी ऑनलाईन गप्पा चाल्ल्याने झोप पण येत नव्हती. कदाचित आजची रात्र नेहमीसारखिच जागुन काढायचा बंड्याचा बेत होता. कॉन्फरन्समधे गप्पांना अगदी बहर आलेला. 
खुप दिवसांनी अशी मैफिल रंगली होती आणि अचानक...

तिळगूळ घ्या... ग्वाड ग्वाड ब्वोला...

3 प्रतिक्रिया


Google.co.in logo on 14th Jan 2010 on occasions of Makar Sankranti

रंगबिरंगी पतंग, त्यांचा करकरीत मांजा, गुळाची पोळी, बाजरीची खुसखुशीत भाकरी, त्यावरचा तुपाचा गोळा, उसाचे कर्वे, ताजा हरभरा, गव्हाची लोंबी, आंबट-गोड बोरं, मातीचं सुगडं, तीळगुळाची वडी, हलव्याचे दागिने, गुलाबी थंडी, सकाळचं कोवळं ऊन, सूर्याचं उत्तरायण आणि एकमेकांना करून दिलेली गोड आणि फक्त गोडच बोलण्याची आठवण..... मकर संक्रातीच्या हार्दीक शुभेच्छा!!!

आपला,
(शुभेच्छुक) सौरभ

नविन वर्ष २०१० च्या शुभेच्छा

4 प्रतिक्रिया
हम्म्म... मला माहितीये शुभेच्छा द्यायला मी जरा उशीरच केलाय ते. नविन वर्ष २०१० चा एक आठवडा उलटूनसुद्धा गेलाय. माझ्यासाठी कोणतही वर्ष, वर्ष नसून एक मोठ्ठा दिवसच आहे. १२ महिन्यांच्या घड्याळाचा. प्रत्येक नविन वर्ष हे एका नविन दिवसासारखं असतं. डिसेंबरची रात्र सरलेली असते. त्या रात्री पाहिलेली स्वप्न साकार करण्याचा संकल्प आपण जानेवारीच्या गार पहाटे करतो. आणि ते पुर्णत्वाला आणण्याची धावपळ फेब्रुवारी-मार्चच्या सकाळी सुरु होते. मेच्या दुपारी थोडी विश्रांती मिळते. जुलै-ऑगस्टची भिजवणारी हळवी संध्याकाळ असते. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दिवेलागणीच्या वेळी गणेशोत्सव, ईद, नवरात्री साजरी करतो. नोव्हेंबरच्या रात्री आपल्या कुटुंबासोबत दिवाळीच्या फराळांचं जेवण आणि थोडं मनोरंजन करुन पुन्हा डिसेंबरच्या रात्री झोपायची तयारी... असो. तसं नविन वर्ष जेव्हा अगदी उंबरठ्यावर असतं तेव्हा आपण सगळेच नविन वर्षाचे जुने संकल्प पुन्हा नव्याने बांधायचा, सरत्या वर्षाचा आढावा घ्यायचा प्रयत्न करत असतो. मीपण तसा आढावा घ्यायचा प्रयत्न केला, जरा वेगळ्या पद्धतीने.

घड्याळात ००:००:०० चा ठोका पडला आणि ३१ डिसेंबर २००९ सुरु झाला तेव्हापासून ते ठीक ००:००:०० ०१/०१/१० चालू होईपर्यंत; त्या २४ तासात दर २ तासांनी मी फेसबुकवर माझं स्टेटस बदलत होतो. ते प्रत्येक २ तास २००९ सालाच्या एका महिन्यासाठी राखिव होते. त्या त्या महिन्यातल्या आठवणींची नोंद घ्यायचा एक साधा छोटासा प्रयत्न होता. त्याला काही प्रतिसाद मिळाले. आणि त्या आठवणींच्या नोंदी आता माझ्या साठवणीत आहेत. :)