गुंड्या: बंड्या, काय करतोयस?
बंड्या: (xx)बाजी...
गुंड्या: क्काय? काय चॅटिंगवर पोरींशी फ्लर्ट करतोयस का?
बंड्या: नाही. स्वतःला विकायला काढलय. बघतोय कोणी घेतय का ते.
गुंड्या: च्यायला काय बोलतोयस?
बंड्या: जॉब अप्प्लाय करतोय. साला सांगतो तुला गुंड्या, वेश्या आहोत आपण, वेश्या.
गुंड्या: आता काय झालं?
बंड्या: काही नाही. जाऊदे... तुला माहितीये का, वेश्या आणि इंजिनिअर, दोघे बघितल तर एकाच कॅटॅगरीत येतात.
गुंड्या: कायतरी काय साल्या! वेडा झालायस तु. सुरुवातीला जॉबसाठी स्ट्रगल करावाच लागतो. उगीच फ्रस्ट्रेट कशाला होतोस..
बंड्या: नाही रे, फ्रस्ट्रेट झालो म्हणून नाही बोलत्ये... त्यांच्यात आणि आपल्यात खुप कमी फरक आहे. बघ, तुला सांगतो...
वेश्या | इंजिनिअर | |
फरक | त्यांना समाजात इज्जत नसते. | आपल्याला काहीतरी असते. |
Fresher: High demand & pay Experienced: Low demand & pay | Fresher: Low demand & pay Experienced: High demand & pay | |
साम्य | त्या विकल्या जातात. | आपलं मार्केटिंग होतं. |
त्यांना जो विकतो तो दल्ला/दलाल. | आपल्याला मार्केट करणारा तो Consultant. | |
भलेही ती दिसायला कितीही सुंदर असो किंवा बाकिचे काही गुण असोत, कवडीची किंमत नाही. | तुम्ही कितीही टॅलेन्टेड असा, स्किलफुल असा त्याचीपण काही किंमत नाही. | |
त्या गिऱ्हाईकाला खुश ठेवतात. | आपण Clientला. |
"क्या हिरो, चलता क्या..." म्हणत रस्त्याच्या कडेला उभं राहून सेल्फ मार्केटिंग चालू असत. कोणी गावला तर कोणती सर्विस कोणत्या भावात दिली जाईल त्याचं सेटिंग. ती मांडवली झाली कि मग दोघे जातात डॉक्टर-डॉक्टर खेळायला... आपण जरा सोफिस्टिकेटेट भाषेत इकडेतिकडे रिझ्युमे टाकून अप्प्लाय करतो. आपले स्किलसेट काय आणि आपला पे-रेट काय त्यावरुन आपण निगोशिएट करतो. च्यायला सांग आता मला काय असा फरक उरला? बोल...
गुंड्या: बंड्या, तु कॉफी घेणार का? वैतागलायस तु... शांत हो. साला आपण इंजिनिअर आहोत. भाड्या इंजिनिअर व्हायला मेहनत लागते ती घेतलिये आपण, कसब लागत ते आहे आपल्याकडे. वेश्या होण्यासाठी अशी क्रायटेरिआ नसते. इंजिनिअर स्वप्न बघतात ती प्रत्यक्षात उतरवतात. मायला इंजिनिअर आहेत म्हणून जग आहे. (गुंड्या तावातावान खेकसला)
बंड्या: अरे, तु साला हायपर झालास...
गुंड्या: मग काय भाडखाव... उगीच साला काहिही बरळत बसलाय. डोका फिरवाचा नाय हा आपला...
बंड्या: ह्यॅह्यॅह्यॅ... तु कॉफी बनवत होतास ना...
गुंड्या: हम्म्म्म... च्यायला... बनवतो...
(ट्रिंगट्रिंग... ट्रिंगट्रिंग... ट्रिंगट्रिंग... ट्रिंगट्रिंग...)
Hello, Yes Sir, this is Gundya speaking... (श्श्शू... इंटरव्ह्यू कॉल...) ya, I am an Engineer, Sir. ya, I've done (blah blah)... I've (blah blah)... I can (blah blah)...
दोन मिनिट, आलोच म्हणुन गुंड्या कॉल अटेन्ड करण्यासाठी दुसऱ्या रुममधे गेला. बंड्या त्याला बघून उपरोधकपणे हसला... दोघांचा कॉफीचा प्रोग्रॅम उगीचच थोड्यावेळासाठी लांबला...
आपला,
(विक्रिस ठेवलेला) सौरभ