आनंदने माझा पोस्ट गुगल बझ्झवर टाकल्यापासून माझ्या ब्लॉगवर एकच धमाल उडालीये. जास्तीत जास्त आठवड्याभरात ६-८ पेजव्ह्यू असलेल्या ह्या ब्लॉगला एकाच दिवसात २००चा आकडा पार होण्याइतपत पेजव्ह्यू मिळाले. आकाशच्या भाषेत सांगायच झालं तर 'आ.प.'ने बझ्झवर एक लिंक पोस्ट काय केली आणि ब्लॉगवर व्हिजिटर्सचा एक ढग बरसून गेला. माझ्यासाठी वाळवंटात पूर येण्यासारखी हि गोष्ट. असो. मला लय भारी वाटलं. एवरेस्ट कुल्याखाली आल्यासारखं. मनाला अनेक लाडू फुटून त्याच्या चुर्णाने सारावल्यासारख्या गुदगुल्या झाल्या. दिलात अनेक चॉकलेट आईसक्रिमचे ज्वालामुखी फुटले. Thank you आनंद. (गळाभेट)
आकाशने आधीच्या पोस्टला एक जालिम हजरजबाबी पोस्ट लिहला. तो मी इकडे जस्साच्या तस्सा टाकतोय.
---------------------------------------------------
आता हे लिहलं तर खरं, पण जर हा पोस्ट सुपर हिट झाला, तर काय रे? > तू NEWS मध्ये झळकशील लेको!!
अश्या अमुक अमुक ब्लॉग मध्ये एक ब्लॉगर आपल्या उपासमारीचे हे वर्णन करतोये बघा!
मग एक डॉक्टर बोलेल > "मला वाटतं ह्याला जर रोज पुरे पूर आहार दिला तर हा पुन्हा एकदा ठणठणीत होऊ शकतो."
मग कॅमेरा इंडियन ऍम्बॅसीच्या ऑफिसवर
"हम पुरी कोशिश कर रहे हैं, की इस संगणकीय अभियंता को हम अपने देश में लाया जाये, और उसका पुनर्वसन करे."
राजसाहेब ठाकरे: "बघा सांगत होतो, त्या अमेरिकेतल्या गोऱ्यांची चमचागिरी करू नका, बघा आज माझा हा बंधू काय उपभोगतोय."
मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण : " हि खूपच गंभीर बाब आहे."
ठाणे रेल्वे स्थानकावरील एक प्रवाशी: "हे भारतीय नौकर वर्गाचा शोषण आहे, त्यांच्या ह्या हावरट वागणुकीचा जवाब त्यांना द्यावाच लागेल."
एक काळा कोट घातलेला म्हातारा वकील: "बघा आम्ही त्या कंपनीला आमच्या तर्फे एक leagal notice पाठवली आहे. जशी पुढे कारवाई होईल तुम्हाला कळवण्यात येईल."
बंड्याचा वर्गमित्र: "नाही, आधी तो चांगला तंदुरुस्त होता. त्याला डबा खायची वेळ इतकी प्रिय होती, की तो शाळेला मधल्या सुट्टीच्या १० मिनिट आधी यायचा."
बंड्याचे शेजारी: "आधी कसा तब्येतीत होता. आमच्या वडलांना एकदा पाय अडकवून पाडून कसा पसार झाला होता! नाही, त्याच्या वडलांनी पैसे दिले आम्हाला. तसं मामुली fracture झालं होतं. हिवाळ्यात दुखत अधून मधून. आमची धाकटी मग बाम लाऊन देते."
तुम्ही पाहत होता हा exclusive report फक्त "बोगस न्यूज" वर!
cameraman गुंड्या बरोबर मी "आचरट"
- आकाश
---------------------------------------------------
आता हा आकाश कोण? आकाश गुप्ते. माझ्या पहिल्या वर्तुळात येणारा मित्र. कलंदर हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणा किंवा बिलंदर कार्ट, both things define him. त्याच्या http://amritasyaputra.blogspot.com/ ह्या ब्लॉगला भेट देऊन बघा. तुम्हाला त्याच्याबद्दल थोडी कल्पना नक्किच येईल. ;) :)
आपला,
(आकाशमित्र) सौरभ