यल्गार - गुरु ठाकुर


एखादं विष भिनावं ना... तसं हे गाणं अंगी भिनतं. गुरु ठाकूरच्या शब्दरचनेबद्दल लिहण्या/बोलण्यासाठी मी शब्दपांगळा आहे. त्याला शब्दशः झुकुन मानाचा मुजरा. आणि श्रीवत्स कुलकर्णीने ज्या पद्धतीने संगितबद्ध केलय त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अक्षरशः धमन्यांमधलं रक्त सळसळतं, माणूस चिथावला जातो... आणि अजून एक खास बात म्हणजे गाण्याला दिलेली "ग्लॅडिएटर" चित्रपटाची पार्श्वभूमी. निव्वळ वेड. कितीदाही ऐकलं तरी कमी आहे. कधी हरल्यासारखं वाटलं कि हे गाणं ऐकावं. पुन्हा एकदा जिंकण्याची उर्मी मनात जागी झालीच पाहिजे... यल्गाSSSर... \m/ \m/

आपला,
(चेकाळलेला) सौरभ

3 प्रतिक्रिया:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

यल्गार गाणं छान आहे. आवडलं. ग्लॅडिएटरची पार्श्वभूमी चपखल बसली आहे. गुरू ठाकूरच्या शब्दांमधे जादू आहे. संगीतसुद्धा मस्तच. हे गाणं मी आधी ऐकलं नव्हतं. कुठल्या अल्बममधलं आहे?

आनंद पत्रे said...

चांगलं गाणं आहे... ग्लॅडिएटर पार्श्वभुमी एकदम मस्त जमली आहे...चांगला अनुभव

सौरभ said...

@KK: अल्बम माहित नाही. अजून कदाचित ऑफिशिअली रिलिझ झालं नसावं.

Post a Comment