द्रविडी प्राणायाम - इतिश्री

तशी मला माचाफुकोने द्रविडी प्राणायामसाठी प्रस्तावना लिहायला सांगितली होती. ते काही आपल्याला झेपलं नाही. पण हो, ह्या प्रावासाची सांगता मात्र करतोय. कराविच लागणार. कारणच तसं आहे. द्रविडी प्राणायामच्या आठही भागांवर तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया मनाला खुप उभारी देणाऱ्या आहेत. पण तुमच्या प्रतिक्रियांना परत प्रतिक्रिया दिली नाही. कारण, सांगण्यासारखं बरंच आहे.

तुम्हा सर्वांना एवढं नक्की समजलं असेल की द्रविडी प्राणायामातील पुर्ण प्रवास खरा घडलेला प्रसंग आहे. पण तरी मी काही गोष्टी औपचारीक रित्या इकडे जाहिर करु ईच्छितो -
१) हो, द्रविडी प्राणायाम, हा एक घडलेला १००% अस्सल, खर्राखुर्रा आणि कोणतीही अतिशयोक्ती नसलेला प्रवास आहे. उगीच मेंदूचे तंतू ताणून, शब्दांचे बुडबुडे सोडुन, विचारांचे पंख, कल्पनेतले रंग.... ब्ला ब्ला ब्ला... (विसरलो, काय म्हणायच होतं ते...) तर असलं काही केलं नाहीये.
२) हा प्रवास मी केलेला नाही.
३) "हे आठही भाग मी लिहले नाहित."

बरं, मग तरी हे सर्व प्रवास वर्णन माझ्या ब्लॉगवर का? ब्लॉगवरच ट्रॅफिक वाढवायला तर नक्किच नाही. (मोठ्ठा नाही. नाहीतला "ना" आणि "ही" जितके जास्त खेचता येतिल तितके खेचा.) खेचलं??? बास आता.
पण प्रतिक्रियांमधे तुम्ही माझं/माझ्या लिखाणाचं जे कौतुक केलं ते वाचुन ज्याम मजा आली. मलापण आणि माचाफुकोलापण. तुमच्या ह्या सर्व कौतुकांचा माचाफुको एक(लो)टा हकदार आहे. आणि त्याच्यापर्यंत तुमच्या सर्व भावना पोचल्या आहेत. मधे मी होतो, पण हरकत नाही. तेवढंच माझं वजन वाढलं. (गणित सोप्पय - कौतुक केलं -> मुठभर मांस वाढलं -> वजन वाढलं, पुढल्यावेळी एवढं स्पष्टीकरण देणार नाही, टायपायला बोर होतं.)

तर.... (विषय भरकटलाय!!!)

अच्छा... तर मग हे सगळं प्रवास वर्णन माझ्या ब्लॉगवर का?? आणि तेपण "माचाफुको" अश्या सतरंगी नावाने का??? ह्याचं कारण असं आहे की, माचाफुको जरा लहरी आहे. कधी काय हुक्की येईल भरोसा नाय. चॅटींग करताना एकदा सहज म्हणाला, एक फ्रिक ट्रिप मारायचीये. मीपण, करतोय्स, कर; म्हणुन नमो नमो केलं. आता शक्यतो (इतर)कोणी असा आगाऊपणा करतं तेव्हा आम्ही आगीत तेल घालतो. उगीच मग समोरच्याला उपसवतो. पुढे त्याच्या होणाऱ्या फजितीचा फुकट तमाशा बघायला मिळतो. पण माचाफुकोची बात निराळी आहे. हा पठ्ठ्या असं बोल्ला म्हणजे आज ना उद्या हा ८-१० दिवसांसाठी गायब होणारच हे नक्की. त्याच्या हाव (कोकणी हो)ला हाव केलं खरं, पण साला काळजीभी वाटली. नंतर एकदा दुसऱ्या मित्राशी बोलताना तो सहज म्हणाला, "अरे, माचाफुको चाल्लाय बॅंगलोरला प्रोजेक्टसाठी." (मी - ह्यॅह्यॅह्यॅ) नंतर दोनतीन दिवसात अजुन एक मित्र बोल्ला, "माचाफुकोने फोन केलेला. प्रोजेक्टसाठी बॅंगलोरला पोचलाय म्हणुन निरोप द्यायला सांगितलय तुला." (मी भौचक्का!!! पोचलापण!!!! च्याsssमायला!!!)

त्यानंतर काही दिवसांनी माचाफुको ऑनलाईन भेटला. "नेटकॅफे (तेच नेटकॅफे जिकडे त्याने "तोलमोल" केलेली) मे है! फोटोका बॅकअप ले रा!! एक बॅच भेजता..." आणि मग त्याने एकदोन किस्से असे ऐकवले, १५०० वरुन एकदम १०० रुपयात कलामंडलममधे झालेली पुर्ण व्यवस्था, (कढईतुन काढलेल्या ताज्या गर्रम जिलेबीसारखे)कथकलीचे फोटो, राजर्षी, मल्लू फिल्म शुटिंग... बॉस्स... माझ्या डोक्यावरचे सगळे केस उद्गारवाचक चिन्हासारखे उभे!!! व्वेड व्वेड व्वेड!!! मी बसल्याबसल्या टुणटुणत होतो. म्हंटल, गड्या... तु हिट्ट हैस!!! हे नुसतं बघुन जर मीच एवढा excite झालोय तर मग बाकीच्यांनापण नक्कीच धमाल येईल. त्याच्याकडुन प्रत्येक दिवसाच्या नोंदी मागवल्या. सांगितलं टाक ब्लॉगवर. पण आता आली का पंचाईत. जर हे द्रविडी प्राणायाम नामक माचाफुको महात्म्य त्याच्या घरच्यांना कळालं, तर गेम ना भाय!!! लफडा फुल्टू!!! पण आपल्याला किस्सा तर ऐकवायचाय. तो फिर अपना ब्लॉग कायको है??? छापो इधरिच!!! तेबी "माचाफुको" टोपणनाव लगाके. छाप्या ना मग लगेच आपनने आक्खी सिरीज. डरता क्या?!

तो ये बात थी, ती सिरीज इकडे टाकायची "माचाफुको" म्हणुन. असो, अजुन एक. तुम्ही विचार करत असाल (नसाल तर करा, आणि नाही केलात तरी मी सांगणार) "माचाफुको" म्हणजे नक्की काय??? तर "माचाफुको" हा "स्वाहिली" भाषेतला एक शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो "CHAOS" (आमचे समानार्थी शब्द: कल्लोळ, त्राहीत्राही, आग आग आग, हैदोस). तर पठ्ठ्याच्या व्यक्तिमत्वाला हा शब्द अगदी चपखल बसतो. म्हणुन "माचाफुको" ह्या टोपणनावाने सदर लिखाण.

(कारणे, संदर्भासहित स्पष्टीकरणं देऊन झाली... च्यावम्याव च्यावम्याव च्यावम्याव... हेपण करुन झालं!!! हम्म्म... तर आता तुमच्या प्रतिक्रियांना प्रतिक्रिया)

राजीव, अनघा, श्रीराज, अपर्णा, आनंद, विद्याधर, हेरंब, Panda, पंकज, रोहन, गौरव - खुप खुप खुप आभार. (खरं तर हे अश्या पद्धतिने आभार मानणं आम्हाला आवडत नाही आणि पटतही नाही. तुमच्या प्रतिक्रिया इतक्या दिल-से आहेत की वाचल्यावर तुम्हाला एक जादू की झप्पी, जोरदार HI5 किंवा कड्डक टाळी द्यावीशी वाटत्ये.)

तुम्ही "माझं" जे कौतुक केलं, ते पाहुन आम्हाला जाम हसू येत होतं. मला खरतर कसंबसं होत होतं. पण म्हटल ठिकाय चालू दे ना जे चाल्लय ते. मलापण वजन वाढवायचंच होतं. (वरचं समीकरण आठवा)

राजीवजी, द्रविडी प्राणायाम वाचुन तुम्ही माझ्या बुद्धीच्या, व्यक्तिमत्वाच्या, लिखाणाच्या प्रेमात पडलात. तुम्हाला "माझ्या"बाबत निराश केल्याबद्दल माफी. मी आधीच वॉर्न (शेन वॉर्न नव्हे) केलेलं. पण तुमचे प्रेम माचाफुकोपर्यंत पोचते झाले आहे. आणि ते द्वाड कार्ट हैच लई प्रेम करण्यासारखं.
अनघा मॅडम, हा हा हा!!! तुम्ही खुप guesses केलेत. पण ते चुकले. :P ;D कन्याकुमारीला नक्की जाऊन या. भारताच्या टोकाशी उभे राहुन तिन समुद्रांचा संगम आणि तिथल्या भिन्न रंगछटा पहाणे, "स्वामी विवेकानंद रॉक" हे दैवी अनुभव आहे.
आनंद, अरे है किधर??? खरंय, करायला आत्मविश्वास लागतो, पण त्याहुन जास्त एक वेड असावं लागतं. :D
अपर्णा, मला खात्री आहे हा (खयाली)पुलाव तुला नक्की आवडला असेल. ;)
हेरंब, दिवसभरात ज्या घटना घडल्या त्यांच्या नोंदी प्रामाणिकपणे मांडायचा प्रयत्न केला. म्हणुन काही लेख मोठे, काही छोटे झालेत. आणि रांचो आणि फुन्सुख वांगडूचं जसं होतं तसं माचाफुको आणि सौरभबद्दल नाहीये. :P (हेहेहे)
बाबा THE PROPHET, (ह्हिहॉहॉहॉ) खरी आयडेंटिटी नाही डिस्क्लोज करु शकत.
श्रीराज, (ख्यॅख्यॅख्यॅ) तुनेभी अंधेरेमें काफी तीर चलाये. पण एकसुद्धा निशाण्यावर नाही लागला.
Panda, तु माझा blog बऱ्यापैकी follow करतोस, आणि तु ह्यावर पहिल्यांदा खास प्रतिक्रिया दिलीस. छान वाटलं. :D
गौरव, हा धाडसी धुरंधर जो कोणी आहे तो "माचाफुको"च.
पंकज (पंकज म्हंटल की मला सिंपु सिंगचा Ask the Pankazz आठवतो.) अरे, तु कॅमेरा फेकणार असशील तर हवं तर आमच्या तोंडावर फेकुन मार. सोबत त्याच्या लेन्सेस/किट तेपण फेकुन मार. आम्ही आनंदाने हा मार सोसुन त्याचा स्विकार करु.
रोहन, (पुन्हा हिहॉहॉहॉ) माझ्यामते आता बऱ्याच गोष्टींची उत्तरं मिळाली असतिल तुला. आणि हो, प्रवास १० तारखेच्या आधी संपवलाय रे. :D :D

आता जाता जाता (माहितीये बरंच लिहलय, पण हत्ती गेला नी शेपुट राहिलं असं व्हायला नको म्हणुन)... मला ह्या प्रवासाबद्दल काय वाटतं ते...

माचाफुकोशी बोलताबोलता तो एकदा सहज म्हणाला, (पाचव्या दिवसाची शेवटची ओळ >>) आयुष्यात काहीही घडू शकतं! आपलं नेहमीचं कवच सोडून थोडं बाहेर पडलो काय आणि काय काय भारी अनुभव आलेत!

ह्या वाक्याने एक जादूची कांडी फिरवल्यासारखी वाटत्ये मला. आपणच आपल्या भोवती जे कुंपण घालुन ठेवलय ते भेदण्याची ताकद आल्यासारखं वाटतय. हे कवच फोडुन, चौकट मोडुन, उंबरठा ओलांडुन, कोषातुन (काहीही असो) बाहेर येणं गरजेच आहे. काहीतरी भारी अनुभवण्यासाठी नसलं तरी खुप काही शिकण्यासाठी. आता हे भेदणं काही कठीण आहे का?? माचाफुकोने जे केलं ते काही विक्षिप्त आहे का?? नक्कीच नाही. पण नेहमीच्या साच्याबाहेरच आहे. ह्हा, प्रवासाची गोष्ट निघालेली तेव्हा तो मला म्हणालेला, मी जे करतोय त्याचं outcome काय असेल माहित नाही. कदाचित खुप रोमांचक अनुभव असेल किंवा खतरनाक. पण जे काही असेल ते अविस्मरणीय असेल. (महेश कोठारेसारखं उजवी मुठ डाव्या तळव्यावर मारत) Damn it!!! आपल्याला हा साचाच मोडता येत नाही राव. आणि आपली उगीचच लाईफच्या बाबतीत कोल्हेकुई चालु असते. मोडा तिच्यायला तो साचा. ओय ओय ओय... मोडण्यापुर्वी आवरा!!! साचा मोडा म्हणजे एकदम पिसाटलेल्या कुत्र्यासारखं काही सद्सद्सौरभबुद्धीला (नेहमी विवेकला कशाला भाव द्यायचा???) सोडुन अनैतिक/बेकायदेशिर करु नका रे!!! च्यायला पोलिस मला घेतिल रिमांडमधे.

असो, माचाफुकोचं आपल्याला भारी कौतुक आहे. त्याच्याबद्दल किती नी काय बोलावं. आपल्याकडुन एक प्रेमळ गळाभेट आणि त्याच्या रुतब्याला सलाम !!!

आपला,
(माचाफुकोलेला) सौरभ

15 प्रतिक्रिया:

Anagha said...

सौरभ!!!!!! ये इकडे तू! फटके मारते तुला!!!!!
'आपणच आपल्या भोवती जे कुंपण घालुन ठेवलय ते भेदण्याची ताकद आल्यासारखं वाटतय. हे कवच फोडुन, चौकट मोडुन, उंबरठा ओलांडुन, कोषातुन (काहीही असो) बाहेर येणं गरजेच आहे. काहीतरी भारी अनुभवण्यासाठी नसलं तरी खुप काही शिकण्यासाठी.' :) खरंय...
मला ना खरं तर काही सुचतच नाहीये लिहायला! आता मग माचाफुको भेटणार नाही का? मला असं खिन्न का व्हायला झालंय?? :(

Pankaj - भटकंती Unlimited said...

कॅमेरा फेकण्याचा बेत रद्द.
भविष्यात कधी झालाच तर ‘माचाफुको’कडे फेकीन. त्याला सलाम सांग आपला.

Machafuko said...

हा हा हा हा!! पण बंड्या लेका तुला दिल निचोडून मिठी रे!
तुझ्या मुले हे सगळं ब्लॉग वर तरी आलं!
एड्या तू लय भारी..... ह्या ह्या ह्या ह्या! :द

अनघा: मला खूप लवकर कंटाळा येत असतो, मग असे धंदे वरचे वर होत असतात. फक्त घरच्यांच्या नकळत!
पंकज: बावा आपको भी होम शोलोम कोर्ताय!!

THEPROPHET said...

कैच्याकै भारी! (ह्याहून मोठी दाद माझ्या शब्दकोशात नाही!)

रोहन... said...

मी बरोबर अंदाज केला होता... अखेर मला अपेक्षित असलेली पोस्ट आली... :)

प्रवास त्याचा असला तरी लिखाण तू केलेस ना???

sanket said...

....
........
...................
.....................................
शब्दच नाहीत भावना व्यक्त करायला !!!
माचाफुको झिंदाबाद

panda said...

फक्त एकच शब्द...महाsssssन !!!! सौरभ....तू आणि "माचाफुको" तुमच्या कारणाने पुन्हा एकदा केरळ आणि कन्याकुमारीची trip झाली....2002 मध्ये गेलो होतो....असे वाटतेय...आता पुन्हा जाऊन आलो.......both of you....tusi great ho praaji!!!...Pankaj Daga (PanDa)

हेरंब said...

सौरभ आणि माचाफुको, दोघांनाही एकदम मोठ्ठा आणि कडडक सलाम.. आधीच्या प्रतिक्रियांमध्ये ठोकला होता त्यापेक्षाही मोठा.. सगळ्यांत सगळ्यांत मोठा..

>> हे कवच फोडुन, चौकट मोडुन, उंबरठा ओलांडुन, कोषातुन (काहीही असो) बाहेर येणं गरजेच आहे. काहीतरी भारी अनुभवण्यासाठी नसलं तरी खुप काही शिकण्यासाठी.

लाखाची गोष्ट बोललास दोस्त.. मस्तच..

रच्याक, आधीच्या प्रतिक्रियांना नवीन पोस्ट लिहून उत्तरं दिल्याने अचानक आम्हास 'गुरुदेवांची' आठवण झाली.. बाबा किंवा आप्पा सांगतील तुला गुरुदेव म्हणजे कोण ते. ;)

सौरभ said...

@विद्याधरा: तुझी (खरंतर कोणाचीही) सर्वात मोठी दाद हि आमची एक मिळकत आहे. माचाफुको कमेंटेस्तोवर मी दोघांतर्फे खुप खुप नम्र धन्यवाद देतो. :D

@रोहन: yessss :D तु योग्य तोच अंदाज केलेलास. मध्यंतरी राजीवजींनी केलेला अंदाज खुपच जवळचा होता. आणि त्या ८ही भागांचे लिखाण माचाफुकोनेच केले आहे. माझं एकसुद्धा वाक्य नाहिये त्यात. म्हणुनच जाहिर केलेल्या गोष्टींमधला ३रा मुद्दा ठळक केलाय. मी फक्त पोस्ट ब्लॉगवर व्यवस्थित दिसण्याची व्यवस्था केली आहे.

@संकेत: you're right!!! माचाफुको झिंदाबाद...

@Pankaj Daga: I'm really happy to see your comment again. And all credit goes to "Machafuko" :D मी आधी नाव "पांडा" म्हणुन वाचलेलं, पण आता समजलं नक्की नाव काय ते. :D पुन:श्च धन्यू.

@हेरंsssब: अरे तुझं नाव घेतलं की मला "गुलाल"मधलं गाणं आठवतं.
"आरंभ है प्रचंड, बोले मस्तको के झुंड, आज जंगकी घडीकी तुम गुहार दो...
आनबानशान यांकी जानका हो दान, आज एक धनुष के बाणपे उतार दो..." (कारण हेरंssब ~ आरंssभ)
ह्याच तालात पुढचं वाच >>
"हेरंब है प्रचंड, त्याचे पोस्टही प्रचंड, तो एव्हढं लिखाण कसं करतो???
विषय मग असो काही, बंध त्याला कसला नाही, ब्लॉगवर यथार्थ तो उतरतो..." :) (विषय पुन्हा भरकटला) :D
अरे मला कशाला सलाम. माझा काहिच सहभाग नाही त्यात. ती लाखमोलाची गोष्टपण माचाफुकोच बोल्लाय. बाकी हा 'गुरुदेवांचा' काय किस्सा हाय???

Deepti said...

कसं आहे सौरभ...तू लिहिले आहेस ते सगळं मान्य...पटत सुद्धा!! पण तरीही असा मनात येईल तेव्हा असं चालू पडणं आपल्याला नाही पटत!!
इथे सगळ्यांना हे पटेलच असं नाही!! असो!!
:)

Shriraj said...

Saurabh!!! :D :D :D

@ Anagha

kay mhanava ata hya saurabh-la! Mazyakadun pan don mastapaiki fatke de tyala;)

आनंद पत्रे said...

सौर्‍या, लेका जिंकलंस... माचाफुकोंला तर कड्डक सलाम...
सुपर्ब सुपर्ब आणि केवळ सुपर्ब...
म्या दिवाळीत जरा नेटोपासावर होतो... म्हणून जरा उशीर झाला बाबा..

सौरभ said...

@दिप्ती: तुझ्या वाक्यात एक शब्द राहिला. मनात येईल तेव्हा "प्रत्येकवेळी" असं चालू पडणं आपल्याला नाही पटत!!!
हि गोष्ट दरवेळी सारखीसारखी केली तर काही अर्थ नाही. मग कदाचित नक्किच हा वेडेपणा ठरेल. "Sometimes" you need to break loose.

@श्रीराज: कौतुकाबरोबर फटक्यांचाही मानकरी माचाफुकोच आहे. :P :))

@आनंद: Thanks and क्या बात है! तुझी दिवाळी जोरदार झाली म्हणायची.

अपर्णा said...

सौरभ आता तू भांडाफोड केलाच आहेस तर तुझ पण कौतुक करायलाच हव....ही सिरीज भन्नाट झालीय...मी कमेंटच्या बाबतीत रेगुलर नव्हते पण तरी तू म्या पामरीची( हेच असेल पामराच स्त्रीलिंग अस जाहीर करूया...) दखल घेतल्याबद्दल तुझ्ज्या ब्लॉगची भगतीण होते कशी.....:) आणि तुला शिक्षा म्हणजे आता आमचे(किंवा माझा) पण ब्लॉग तुला वाचवा लागेल ....(ही ही....नाई रे काळजी करू नकोस हे मी उगीच लिहिलंय...उगाच सूर्याला दिवा दाखवायचं धाडस निदान माझ्याकडून तरी नको....)

माचाफुको, तुला पुन्हा एकदा त्रिवार वंदन....आणि फोटो इतके अप्रतिम आहेत की तू स्वत:चा एक फोटूब्लॉग सुरु करून टाक बबा...
हा अनुभव आमच्यासाठी पण बराच काही शिकवून (आणि खूप सारी असूया निर्माण करून ....) गेलाय...आयुष्यात काहीही घडू शकतं...:)

सौरभ said...

अपर्णा: हाहाहा... मीतर माझ्याच ब्लॉगच्या बाबतीतच रेग्युलर नाही. मध्यंतरी विसरुनच गेलेलो की माझापण ब्लॉग आहे. आणि कमेंट्स रेग्युलर असो/नसो, छोटेसे का असोत, ते आमच्यालेखी लाखमोलाचे आहेत.
आणि खरं सांगायचं तर तुझ्या ब्लॉगबद्दल मला माहितीये. तुझ्या ब्लॉग्ससकट असे अनेक ब्लॉग्स (जे फॉलो नाही करत्ये) माझ्या यादीत आहेत आणि मला वाचायचे आहेत. पण मी जे ब्लॉग फॉलो करतोय तेच पुर्ण वाचले नाहित. उदा. विद्याधर, हेरंब, रोहन ह्यांचे ब्लॉग्स. (मो.फु.चा दिवाळी अंकपण नाही वाचला पुर्ण) आणिक बरेच ब्लॉग्सबद्दल माहिती आहे तरी त्यावरचे एखाद/दुसरे लेख वाचले असतिल. किती लेख माझ्या वाचनातुन सुटले असतिल... अरेरे.. असो, आत्तापुरती चुक सुधारुन तुझा ब्लॉग फॉलो करतो आहे. :) उशीर केल्याबद्दल क्षमस्व. :) smile :)

Post a Comment