शाळेत असताना मी काही कविता केलेल्या आणि एका वहीत लिहून ठेवलेल्या. ती वही सापडली. कविता वाचल्या तेव्हा भारी हसायला आलं. उगीच काहिही यमकं जुळवून कविता केल्यात. ह्या कविता पुर्णपणे विस्मृतीत गेलेल्या. वही मिळाली तशी लगेच स्कॅन करुन घेतली. ज्यांच्याबोवती तुटक बॉर्डर आहे त्या इतर कुठेतरी वाचलेल्या, आवडलेल्या म्हणून नोंद करुन ठेवलेल्या होत्या. तरी आयुष्यात जी पहिली कविता केलेली ती ह्यात नाही. पण माझ्या लक्षात आहे. अशी होती ती...
लहान बाळाला असते काय अक्कल
चड्डीचे सुटले असते त्याचे बक्कल
नीट नसते धड त्याची चप्पल
त्याला असते एक गोलगोल टक्कल
टकल्यात काय शिरणार अक्कल
म्हणून तो करतो साऱ्यांची नक्कल
चड्डीचे सुटले असते त्याचे बक्कल
नीट नसते धड त्याची चप्पल
त्याला असते एक गोलगोल टक्कल
टकल्यात काय शिरणार अक्कल
म्हणून तो करतो साऱ्यांची नक्कल
बाकिच्यांची स्कॅन्ड कॉपी खाली देतोच आहे.
आपला,
(हाप चड्डीतला) सौरभ
2 प्रतिक्रिया:
माझ्या घरी इतक्यात एक पोपट बोलायला लागलाय..त्याच्याकडून तुझ्या कविता म्हणून घ्यायला हव्यात....:D
lol... माझ्या नको, पण कोणत्यातरी छानश्या कविता त्याच्या आवाजात नक्की रेकॉर्ड करुन घ्या. :)
Post a Comment