दिनचर्या

पहाटेचा रामप्रहर, वाजे घड्याळी गजर| झोपेचं खोबरं, होतसे||
पेंगुळलेले डोळे, जड त्या पापण्या| स्वप्नांचा चक्काचूर, पहातसे||
दमदार जांभई, अन् आळस घेऊन| गजराचे घड्याळ, पुन्हा स्नूझमधे||
उषःकाल सरुन, मध्यान्ह जाहली| निद्राभंग झाला, गरमीने||
आढेवेढे घेत, पांघरुण सारले| उठावे लागले, नाईलाजे||
प्रातःर्विधी कारणे, न्हाणीघराकडे कूच| नेमक्यावेळी ते, व्यस्त असे||
तोवरी आदण चहाचे, ठेवावे गॅसवर| दिवसाची सुरुवात, अमृताने||
दंतमंजन लेप, घ्यावा ब्रशवरी| लेपून तोंडभरी, मौजे घासावे||
खळाखळ भरुन चूळ, मुखमार्जन पात्री| चेहरा धुवावा, साबणाने||
शुचिर्भुत होवून, प्रसन्न व्हावे| दिनक्रम आपुला, आरंभावा||
चहा वाफाळता, घ्यावा गाळून| सोबती रवंथ, बिस्किटांचे||
बैठक घ्यावी, लॅपटॉपसमोर| साईट विहार, प्रारंभावा||
ना स्क्रॅप कोणाचे, ना एकही ईमेल| तरी पेज रिफ्रेश, करित रहावे||
घटीका सरतील, निष्क्रिय अश्याच| गर्भी उद्रेक, वायुचे||
सारुन बैठक, घ्यावी विश्रांती| निमित्त करावे, न्याहारीचे||
शमवूनी भुक, वामकुक्षी घ्यावी| बागडावे आनंदे, संध्याकाळी||
रात्र होता परतावे, आपुल्या घरी| व्यवस्था करावी, भोजनाची||
आपलेच हात, अन् आपलेच पोट| जाणोनी करावा, स्वयंपाक||
चलचित्र पहाता, उदरभरण करावे| तृप्त व्हावे करुन, हे यज्ञकर्म||
पांघरुण पसरुन, द्यावी ताणून| निद्रिस्त व्हावे, शांतचित्ते||
स्वप्नांचा खेळ, खेळत झोपावे| असा न्यावा दिवस, पुर्णत्वे||
दिनचर्या अशीच, थोड्याफार फरकाने| होतसे रोज त्यात, नाविन्य नसे||
सौरभ म्हणे ज्याने, कंठीले आयुष्य ऐसे| आदर्श बेरोजगार म्हणूनी, गौरवावे||


आपला,
(संत) सौरभ

8 प्रतिक्रिया:

Aakash said...

waah re pathyaa! shevatchya oli ne tar. jaam majja anlaa!

Jay ho Baba Bongs ki Jay ho!

आनंद पत्रे said...

:) ekdum sahi

सौरभ said...

:D thnx aakash... thnx anand :)

Deepti said...

wa wa layich bhari ki rao!!!
jamalay jamlay;)

iron_maiden said...

Ya divti sorry divya santra.......maaf kara....santa wani ni mjahayt sakshatkar ghadwoon anla ahe..... mala sant shri saurabh buwa yancha abhiman ani irsha donhi watattat. Abhiman karan tyancha tondon shri ALSOBA PRASANNA(His holy laziness) swatah bolle ahet..ani irhsa ya karanastahi karan ashi dinacharya asayla Bhagya lagata ho............

सौरभ said...

@Deepti: hehe... rikampaniche udyog aahet he...

@Megh: hahaha^(infinity).. संत्र वाणी... आळसोबा प्रसन्न (his holy laziness) lolaa भन्नाट... आता मी संत्र वाणी ह्या नावाखाली माझ्या मनाचे श्लोक लिहायला चालू करणार आहे...

रोहन... said...

ऐ खरच मस्त लिहिले आहेस... सोपे आणि साधे पण मजेशीर... आवडले.. :)

सौरभ said...

:D thanku thanku :D

Post a Comment