द्रविडी प्राणायाम - दिवस चौथा

१५ ऑक्टोबर:

आज सकाळ पासून धुवाधार पाऊस सुरु आहे. तरी भटकेगिरी करायचा वेळ वाया न घालवता पुन्हा एकदा कलामंडलममध्ये घिरट्या मारत राहिलो. काहीच सोडायचं नाही! आज मला कथकली मेकअप सहित बघायचा होता. चौकशी केली, पण असा काही प्रोग्रॅम नव्हता. मग तुलसी सरांनी एक पत्ता लिहून दिला, तिकडे आज संध्याकाळी कथकली मेकअप सहित बघायला मिळेल असं सांगितलं. हा पत्ता 'पैन्कुलम' नावाच्या गावातला होता. दुपारपर्यंत पुन्हा एकदा कलामंडलमच्या कॅम्पसची सैर करून आलो.


हि त्या कार्यक्रमाची सूची पत्रिका होती.
पैन्कुलमला दुपारचं जेवण उरकून निघायचं ठरवलं, जेणेकरुन मग मेकअप करण्यापासून सगळंच अनुभवता येईल! दुपारचं जेवण हॉटेल स्टेशनरीमधे घेतल्यावर, हॉटेल मालकालाच - पैन्कुलमला जायचा रस्ता विचारला. त्याने पत्ता वाचताच, मला समजावला, कुठून कशी बस पकडायची. मग एक पत्रिकापण दिली. सगळंच मल्याळममध्ये लिहलं होतं.

अजूनही पाऊस पडत होता. २ बस बदलून मी पैन्कुलमला पोहचलो. मग ती पत्रिका दाखवत दाखवत मी रामचकीयार स्मारक कलापीडमला पोहचलो. बरंच रिमोट गाव आहे हे. पाऊस पडल्याने सगळंच एकदम हिरवंकंच झालं होतं. Landscapes तर नुसते वेड लावत होते. भाताचे शेत, ढगांनी भरलेलं आकाश, शेतांच्या पुढे डोंगरांची रास, उंचच उंच नारळाची आणि सुपारीची झाडं, त्यात एखाद्या शेतकऱ्याची हाळी. छोटेशे पूल, मासे पकडायला गळ टाकून बसलेली पोरं, त्यांच्यात्यांच्यातला चिवचिवाट. थोडक्यात सांगायचं म्हणजे इथे लोकांचं आयुष्य materialistic नाही. लोक त्यातल्यात्यात सुजाण आहेत. इकडच्या प्रत्येक गोष्टीत डुबलो होतो.


कलापीडम म्हणजे नाट्यगृह असेल अशी माझी संकल्पना क्षणातच विरघळली. रामचकीयार ह्यांच्या स्मारकाच्या अंगणातच एक स्टेज होता. मग थोडी ओळख देऊन मी Greenroom बघायची संमती घेतली. आत श्रुती इंद्र सर मेकअप चे रंग तयार करत बसले होते! मला बघून हालहवाल विचारले. श्रुती इंद्र सरांचं बालपण जबलपूर मध्ये गेलं होतं. हिंदी मध्ये ती छाप येत होती. मग रंग कसे बनवतात हे बघता बघता, आमचा गप्पा पण रंगत होत्या. आज कृष्ण-सुदामा भेट, या काव्यावर कथकली होणार आहे. त्याच्या आधी श्रुती इंद्र सर प्रस्तावना देणार आहे.

भरपूर फोटो काढले आहेत! दुपारचे २ वाजल्या पासून ते रात्री १० पर्यंत इथेच फोटो काढत, observations करत बसलो होतो. हॉस्टेलला परत येतांना बस नसल्याने, लिफ्ट देणाऱ्याचे आभार मानून ताणून दिली! उद्या सकाळी लवकर निघायचं आहे.

आपला,
(लहरी) माचाफुको

Click here to see more images

5 प्रतिक्रिया:

अनघा said...

पण मग कथकलीचं वर्णन? सुरुवात वाचून मला वाटलं आज आपण कथकली बघणार आहोत! :( फोटो छान आहेत!

Pankaj - भटकंती Unlimited said...

जबर्‍या!!

THE PROPHET said...

>>सुरुवात वाचून मला वाटलं आज आपण कथकली बघणार आहोत! :(
मलापण असंच वाटलं!!
पोस्ट मस्त पण!

श्रीराज said...

माचाफुकोची photography ही एकदम आवडली हां :)

Machafuko said...

मुद्दामच कथकली बदल लिहलं नाही. मी ह्या कलेबद्दल लिहून ह्या art form वर इंसाफ करीन ह्याची मलाच खात्री नाहीये.

असो, लायब्ररी मध्ये काढलेल्या नोट्स आहेत, त्या नक्की share करीन :)

Post a Comment